गाणं कशात असतं ? बाबा मला सांगा ना गाणं कशात असतं ? बाबा सांगे लेकीला ..अगं ते कशात नसतं ? एकसाथ नमस्तेला, गाणं तुमच्या शाळेत असतं निखळून खाली पडताना ते, गोल मण्यांच्या माळेत असतं.... गाणं आगगाडीच्या, लांबलचक शिटीत असतं... विटीदांडू खेळताना ते, उंच मारल्या विटीत असतं... गाणं घुंघुर लावल्या बैलगाडीच्या, धावणाऱ्या चाकात असतं... रवीे फिरवून घुसळताना ते, फेसाळलेल्या ताकात असतं... गाणं टप टप पडणाऱ्या बर्फाच्या, गार गार गारेत असतं... कोसळणाऱ्या पावसाच्या, मुसळधार धारेत असतं... गाणं घोंघावणाऱ्या सोसाट्याच्या, थंड गार वाऱ्यात असतं... खडकावर आदळणाऱ्या, लाटांच्या माऱ्यात असतं... गाणं फुलं आणि फुलपाखरांच्या रंगीत रंगीत बागेत असतं... समेवर सुंदर घेतलेल्या, त्या नेमक्या जागेत असतं... ...
पोस्ट्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
"तबला " या वाद्याबद्दल सुंदर लेख जरुर वाचा. बरेच पालक आपल्या लहान मुलाला तबला शिकायला क्लास मध्ये घेऊन जातात. पालकांचा पहिला प्रश्न असतो "याला किती दिवसात तबला वाजवता येईल?" . यासारखा अज्ञानमूलक प्रश्न जगात दुसरा कोणताच नसेल. आधीच पालकांनी मुलाचं नाव सचिन ठेवलेलं असतं. पण शहरातील मैदानांची कमतरता, टीव्ही मुळे लहानपणीच लागलेला चष्मा, मुलाने कायम टॉपर असावे म्हणून बालवाडीपासून लावलेल्या ट्युशन अशा कारणांनी या सचिनचा क्रिकेट शी फारसा संबंध येत नाही . आता आपला मुलगा सहा महिन्यात 'उस्ताद झाकीर हुसेन' बनावा असं बहुसंख्य पालकांना वाटायला लागतं. मग एक दोन दिवसातच शेजारच्यांनाही 'आमचा मुलगा तबला शिकतो' अशी फुशारकी मारून पालक भाव खातात. शेजारी देखील " अरे वा, उस्ताद सचिन आपल्या कॉलनीचं नाव काढणार बुवा, ख्याक...ख्याक...." असं बोलत सचिनच्या आई कडून चहा वसूल करतात. मुलगा चार आठ दिवसांतच घरात दादरा, त्रिताल, झपताल असे शब्द बोलायला लागतो. 'तक तिरकीट तक', घिडनग तीट तीट' असे रेले घोटायला लागतो. जेवताना डायनिंग टे...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Music Is Not What I Do Music Is The Medicine Of The Mind “Music is like a dream. One that I cannot hear.” ― Ludwig van Beethoven “Without music, life would be a mistake” ― Friedrich Nietzsche “I can chase you, and I can catch you, but there is nothing I can do to make you mine.” ― Morrissey “Music gives a soul to the universe, wings to the mind, flight to the imagination and life to everything.” ― Plato “How is it that music can, without words, evoke our laughter, our fears, our highest aspirations?” ― Jane Swan “If I were not a physicist, I would probably be a musician. I often think in music. I live my daydreams in music. I see my life in terms of music.” ― Albert Einstein “Music is a language that doesn’t speak in particular words. It speaks in emotions, and if it’s in the bones, it’s in the bones.” ― Keith Richards “I think music in itself is healing. It’s an explosive expression of humanity. It’s something we are all touched by. No matter what cu...
एखादा सूर असा यावा
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
एखादा सूर असा यावा क्षितिजाचा पार दिसावा।। एखादा आलाप असा खुलावा सारा आसमंत उजळून जावा।। एखादी तान अशी बरसावी सारी तृष्णा मिटून जावी।। एखादी सरगम अशी लहरावी वार्यालाही भूल पडावी।। एखादी लय अशी जुळावी सारी जाणीव विरुन जावी।। एखादा ताल असा भरावा अंतापर्यंत तोल रहावा।। एखादी सम अशी पडावी जिवाशिवाची गाठ व्हावी।। एखादा राग असा फुलावा अनंताला जाऊन भिडावा।। एखादा ख्याल असा मांडावा यमुनातीरी ताज बनावा।। एखादी ठुमरी अशी रंगावी इंद्रधनूची कमान व्हावी।। एखादं गीत असं छेडावं शब्दांपलिकडे बोलकं व्हावं।। एखादं भजन असं गावं निर्गुणाचं कोडं सुटावं।। एखादा श्रोता असा मिळावा अद्वैताचा स्पर्श घडावा।। एखादा संवाद असा जुळावा गगेवरती चंद्र झुलावा।। एखाद...